
बुद्धिबळ विश्वचषकात अंतिम सामना खेळून आर. प्रज्ञानानंद यांनी नवा विश्वविक्रम केला. वयाच्या 18 व्या वर्षी अंतिम फेरीत गाठणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे.

आर. प्रज्ञानानंद याच्या व्यतिरिक्त काही भारतीय क्रीडापटूंनी लहान वयातच जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. 18 वर्षापूर्वीच आपल्या कर्तृत्वाने लक्ष वेधून घेणाऱ्या पाच क्रीडापटूंबाबत जाणून घेऊयात.

मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी सर्वात तरुण नेमबाज होण्याचा विक्रम केला आहे. 2018 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी तिने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

जेरेमी लालरिनुंगने 2018 युवा ऑलिंपिकमध्ये 62 किलो गटात एकूण 274 किलो (124 किलो + 150 किलो) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. तेव्हा ती 16 वर्षांची होती.

मेहुली घोष हीने 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. तेव्हा ती 17 वर्षांची होती.

हिमा दासने 2018 मधील जागतिक U20 चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तेव्हा 18 वर्षांच्या हिमा दासने महिलांची 400 मीटर शर्यत 51.46 सेकंदात पूर्ण केली होती.

2019 टी20 विश्वचषकात खेळणारी शफाली वर्मा हीने सर्वात तरुण क्रिकेटपटू म्हणून विश्वविक्रम केला. वयाच्या 15 व्या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व करत त्याने ही कामगिरी केली. आयसीसीने टी20 क्रमवारीत क्रमांक 1 मिळवणारी सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू होण्याचा विक्रमही शफाली वर्माच्या नावावर आहे.