Test Cricket : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, जो रुट वर्ल्ड रेकॉर्डपासून किती दूर?
Most Test Runs World Record : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलतर याच्या नावावर आहे. मात्र जो रुट याला सचिनचा हा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. रुटला यासाठी किती धावांची गरज आहे? जाणून घ्या.

भारताचा माजी फलंदाज 'द वॉल' अर्थात राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. द्रविडने 164 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 288 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस कसोटीत सर्वाधिक धावांबाबत चौथ्या स्थानी आहे. कॅलिसने कारकीर्दीत एकूण 13 हजार 289 धावा केल्या आहेत. (Photo Credit : AFP)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगने 168 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 378 धावा केल्या आहेत. (Photo Credit : AFP)

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट दुसऱ्या स्थानी आहे. रुटने आतापर्यंत 164 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 952 धावा केल्या आहेत. रुटकडे सचिनचा सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

सचिनने कसोटी कारकीर्दीत 200 सामन्यांमधील 329 डावांत 53.78 च्या सरासरीने एकूण 15 हजार 921 धावा केल्या आहेत. सचिनने या दरम्यान 51 शतकं आणि 68 अर्धशतकं झळकावली आहेत. आता रुटला सचिनला मागे टाकण्यासाठी 1 हजार 969 धावांची गरज आहे. (Photo Credit : GETTY)