WTC इतिहासात सर्वाधिक सामने गमावणारे संघ, पाकिस्तानचा कितवा नंबर?
Most Lost In WTC History: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सध्या तिसऱ्या साखळीचा थरार सुरु आहे. या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वाधिक सामने गमावलेत? जाणून घ्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने गमावण्याच्या यादीत पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा 35 पैकी 17 सामन्यात पराभव झाला आहे. (Photo Credit : Pakistan Cricket X Account

दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेने एकूण 34 सामने खेळले आहेत. तर 17 वेळा दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला आहे. (Photo Credit : Proteas Men X Account)

वेस्ट इंडिज तिसऱ्या स्थानी आहे. विंडिजने आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात 35 सामने खेळले आहेत, त्यापैकी 21 वेळा पराभव झाला आहे. (Photo Credit : Windies Cricket X Account)

या यादीत दुसऱ्या स्थानी शेजारी बांगलादेश आहे. बांगलादेशने 21 सामने गमावले आहेत. टीम इंडियाने नुकतचं मायदेशात बांगलादेशला 2-0 ने पराभूत केलंय. (Photo Credit : Bangladesh Cricket X Account)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत इंग्लंडने सर्वाधिक सामने गमावले आहेत इंग्लंडला आतापर्यंत एकूण 23 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Photo Credit : England Cricket X Account)