AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy: मुंबई उत्तर प्रदेशवर पराभवाची नामुष्की, देवदत्त पडिक्कलची जादू चालली

विजय हजारे ट्रॉफीत उपांत्यपूर्व फेरीचे सामने पार पडले. मुंबई विरुद्ध कर्नाटक आणि उत्तर प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटक आणि सौराष्ट्रने बाजी मारली. बाद फेरीत हार्विक देसाई आणि देवदत्त पडिक्कल यांनी चांगली फलंदाजी केली.

| Updated on: Jan 12, 2026 | 8:25 PM
Share
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने मुंबईचा आणि सौराष्ट्रने उत्तर प्रदेशचा धुव्वा उडवला. यासह कर्नाटक आणि सौराष्ट्रने उपांत्य फेरीत धडक मारली. कर्नाटकच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो देवदत्त पडिक्कल... त्याने 95 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी केली. तसेच करूण नायरनेही 74 धावा काढल्या. (PC-PTI)

1 / 5
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 254 धावांपर्यंत मजल मारली. यात शम्स मुलानीने 86 आणि सिद्धेश लाडने 38 धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा संघ 250 धावापर्यंत मजल मारू शकला. कर्नाटकने 33 षटकात 1 गडी गमवून 187 धावा केल्या. पण या सामन्यात पाऊस पडल्याने व्हीजेडी मेथडने हा सामना कर्नाटकने जिंकला. (PC-PTI)

2 / 5
उत्तर प्रदेशने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात 50 षटकात 310 धावा केल्या. पण असं असूनही रिंकु सिंहच्या संघाला 17 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. कारण या सामन्याचा निकालही व्हीजेडी मेथडने काढला गेला. या सामन्यातही पावसाने हजेरी लावली. सौराष्ट्रने 40.1 षटकात 3 गडी गमवून 238 धावा केल्या होत्या. (PC-PTI)

3 / 5
रिंकु सिंह नेतृत्वात खेळणाऱ्या उत्तर प्रदेश संघाला या निकालामुळे धक्का बसला आहे. कारण या संघाने साखळी फेरीत सलग सात सामने जिंकले होते. पण बाद फेरीत व्हीजेडी मेथडमुळे पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात रिंकु सिंहने 13 धावांची खेळी केली. तर समीर रिझवी नाबाद 88 धावा राहिला आणि त्यामुळे 300 पार धावा झाल्या. (PC-PTI)

4 / 5
विजय हजारे ट्रॉफीत उपांत्यपूर्व फेरीचे सामना दिल्ली आणि विदर्भ यांच्यात होणार आहे. तर पंजाब आणि मध्य प्रदेश यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यातून कोणते दोन संघ उपांत्य फेरी गाठतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  (PC-PTI)

5 / 5
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप

लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा