
विराट कोहली 13 व्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने वर्ल्ड कपमधील 11 सामन्यांमध्ये 765 धावा केल्या. विराटला या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं.

टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवला.

विराटने वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 19.56 तास बॅटिंग केली. मात्र विराटने जीव तोडून मेहनत केली. मात्र टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. याआधी न्यूझीलंडच्या केन विलियमसन याने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 18 तास 51 मिनिटं बॅटिंग केली.

सचिन तेंडुलकर यानेही 18 तासांपेक्षा अधिक वेळ वर्ल्ड कपमध्ये बॅटिंग केली. सचिनने 2003 मध्ये 18 तास 50 मिनिटं बॅटिंग केलीय.

तसेच विराट एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटने याबाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. सचिनने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या.