आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद कोणता संघ जिंकेल? एबी डिव्हिलियर्सने या टीमला दिली पसंती

आयपीएल 2025 स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 22 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. असं असताना यावेळी जेतेपद कोण पटकवणार? याची उत्सुकता आहे. एबी डिव्हिलियर्सने याबाबत आपलं मत मांडलं आहे.

| Updated on: Mar 19, 2025 | 2:48 PM
1 / 6
आयपीएल जेतेपदाचं काही संघांचं स्वप्न अजूनही अधुरं राहिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. पण प्रत्येक वेळी पदरात निराशा पडली आहे. यात दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आहेत. पहिल्या पर्वापासून खेळणाऱ्या या फ्रेंचायझींना अजूनही जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. असं असताना एबी डिव्हिलियर्सने यावेळी कोणता संघ कप जिंकेल याचे भाकित केले आहे.

2 / 6
एबी डिव्हिलियर्सने यंदाच्या जेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला कौल दिला आहे. कारण मेगा लिलावानंतर या संघाची मजबूत बांधणी झाली असून प्लेइंग इलेव्हनमध्ये संतुलन आहे. एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, 'यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा मजबूत संघ आहे.'

3 / 6
आरसीबीची फलंदाजी मजबूत आहे. या संघात विराट कोहली आणि फिल सॉल्ट चांगली सुरुवात करून देतील. तर गोलंदाजीत अनुभवी भुवनेश्वर कुमार आहे. त्याला जोश हेझलवूडची साथ मिळणार आहे.

4 / 6
जोश हेझलवूड या स्पर्धेत फिट अँड फाईन राहिला तर निकाल आरसीबीच्या बाजूने लागेल. कृणाल पांड्यासारखा अनुभवी अष्टपैलू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे आरबीचा संघ मजबूत स्थितीत आहे.

5 / 6
आयपीएलच्या 18व्या पर्वात आरसीबीचा संघाची मजबूत बांधणी झाली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापासून विजयाची चव चाखावी लागणार आहे. आरसीबीचा पहिला सामना 22 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. पहिल्या सामन्यापासून आरसीबीचं आकलन होणार आहे.

6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, नुवान तुषारा, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथेल, मनोज भंडागे, स्वस्तिक चिकारा, देवदत्त पडिकल, मोहित राठी, अभिनंदन सिंग, लुंगी एनगिडी. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)