
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली... विराट कोहलीला ओळखत नाही असा क्वचितच कुणी असेल... विराटची खेळी क्रिकेटप्रेमींना प्रभावित करते. लाडक्या विराटबद्दलची एक खास गोष्ट तुम्ही जाणून घेतलीच पाहिजे....

विराट उत्तम क्रिकेटर आहेच... जगभरात त्याची महान खेळाडू ही ओळख आहेच. पण या पलिकडे विराटच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. तो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

भारतात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोव्हर्स विराट कोहली याचे आहेत. 270 मिलियन नेटकरी विराटला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. देशातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा हा आकडा सर्वाधिक आहे.

विराट कोहलीच्या बॅटिंगचे जितके चाहते आहेत. तितकंच त्याचं व्यक्तिमत्व आवडणारे लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा विराटचे इन्स्टाग्रामवर जास्त फॉलोव्हर्स आहेत.

विराटच्या मैदानातील खेळी इतकंच लोकांना त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयीदेखील जाणून घ्यायला आवडतं. त्याचमुळे सोशल मीडियावर लोक त्याला सर्वाधिक फॉलो करतात. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतही केमेस्ट्रीही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरते.