
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आपला सहावा सामना इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचा हा 100 सामना असणार आहे. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्मा याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील एकूण 99 सामन्यात कर्णधारपद भुषवलं आहे. त्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित भारताने 73 सामन्यात विजय, तर 23 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. दोन सामने अनिर्णित ठरले. (Photo- BCCI Twitter)

कर्णधार म्हणून रोहित शर्मा याने दो आशिया कप, निदाहस ट्रॉफी आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा पूर्ण करणाच्या वेशीवर आहे. इंग्लंड विरुद्ध 47 धावा करताच हा मान मिळणार आहे. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्मा याने तिन्ही प्रकारात आतापर्यंत 456 सामन्यातील 476 डावात 17,953 धावा केल्या आहेत. यात 45 शतकं आणि 98 अर्धशतकांचा समावेश आहे. यात 264 हा सर्वोत्तम स्कोअर आहे. (Photo- BCCI Twitter)

रोहित शर्मा याने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 5 सामन्यात 62.20 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा याने सर्वोत 131 धावा केल्या. (Photo- BCCI Twitter)