
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 191 धावांवर रोखलं. त्यामुळे आता भारतासमोर सोपं आव्हान असणार आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडून मोठी चूक झाली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने वेगळीच जर्सी परिधान केली होती. त्याच्या ही चूक लक्षात आली आणि ड्रेसिंग रुमकडे बोट दाखवून इशारा केला आणि जर्सी मागवली.

सामना सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत झालं तेव्हा विराट कोहलीची जर्सी वेगळी होती. खांद्यावर तिरंगी पट्ट्यांऐवजी पांढऱ्या पट्ट्या होत्या. ही भारताची वनडेतील जर्सी आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले.

चुकीच्या जर्सीत क्षेत्ररक्षण करत असल्याचं विराट कोहलीच्या लक्षात आलं नाही. पण एक षटक संपताच त्याने ड्रेसिंग रुमकडे धाव घेतली. तसेच वर्ल्डकपची जर्सी परिधान करून तंबूत परतला.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल याने पुनरागमन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो डेंग्युमुळे त्रस्त होता. इशान किशन ऐवजी शुबमन गिल याला संधी देण्यात आली आहे. तर आर अश्विनच्या जागी शार्दुल ठाकुरला संधी मिळाली आहे.

इंडिया प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.