Sri Lanka crisis: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचा अखेर राजीनामा ; आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण

श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. "नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील," असे ते म्हणाले. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी उद्या खासदारांना बोलावण्यात आले आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 15, 2022 | 11:52 AM
1 / 5
आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर कोलंबोच्या रस्त्यांवर जल्लोषाचे वातावरण आहे. आंदोलक गोटाबायांच्या राजीनाम्याकडे आपला विजय म्हणून पाहत आहेत.

2 / 5
गुरुवारी रात्री उशिरा अनेकांनी कोलंबोच्या रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला. यावेळी फटाके फोडण्यात आले, लोक मस्ती करताना दिसले. दुसरीकडे, आंदोलकांनी ताब्यात घेतलेल्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींमधूनही माघार घेण्यास सुरुवात केली आहे.

3 / 5
श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. "नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील," असे ते म्हणाले. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी उद्या खासदारांना बोलावण्यात आले आहे.

श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. "नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील," असे ते म्हणाले. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी उद्या खासदारांना बोलावण्यात आले आहे.

4 / 5
श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनीपळून जात सिंगापूर गाठले. या मुद्द्यावर सिंगापूर सरकारने भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राजपक्षे येथे खाजगी भेटीवर आले आहेत, त्यांना कोणताही आश्रय देण्यात आलेला नाही

5 / 5
सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, राजपक्षे यांना खाजगी भेटीवर सिंगापूरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. त्याने आश्रयाची कोणतीही मागणी केलेली नाही किंवा त्याला आश्रय देण्यात आलेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. सिंगापूर सहसा आश्रय विनंत्या मंजूर करत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us