गिरगावच्या स्वागतयात्रेत सहभागी झाले मराठी कलाकार

देशभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय. मराठी कलाकारांनीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. गिरगावमधील स्वागतयात्रेत बरेच मराठी कलाकार सहभागी झाले होते.

| Updated on: Apr 09, 2024 | 4:34 PM
1 / 5
आज सगळीकडेच गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. स्टार प्रवाह वाहिनीच्या कलाकारांनीही मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. गिरगाव इथल्या भव्यदिव्य स्वागतयात्रेत स्टार प्रवाहचे कलाकार सहभागी झाले

आज सगळीकडेच गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. स्टार प्रवाह वाहिनीच्या कलाकारांनीही मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. गिरगाव इथल्या भव्यदिव्य स्वागतयात्रेत स्टार प्रवाहचे कलाकार सहभागी झाले

2 / 5

मालिकेतल्या प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत द्विगुणीत झाली. रेश्मा शिंदे. सुमीत पुसावळे, तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अभिजीत खांडकेकर, शिवानी बावकर, आकाश नलावडे, विशाल निकम या कार्यक्रमात उपस्थित होते.

3 / 5

पूजा बिरारी, इशा केसकर, अक्षर कोठारी, मधुरा देशपांडे, कुंजिका काळविंट, फुलवा खामकर आणि वैभव घुगे या कलाकारांनी स्वागतयात्रेची शोभा खऱ्या अर्थाने वाढवली.

4 / 5

गुढीपाडव्याच्या या खास प्रसंगी ढोल-ताश्यांच्या गजरात स्टार प्रवाहच्या मराठी दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळाही थाटात पार पडला.

5 / 5

मराठी परंपरेचं प्रतिक असणारी ही मराठी दिनदर्शिका प्रवाह कुटुंबातील कलाकारांच्या मराठमोळ्या अंदाजाने सजली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही दिनदर्शिका प्रेक्षकांना भेट देण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us