तुम्हालाही गाडीची टाकी पेट्रोल किंवा डिझेलने फुल्ल करायची सवय आहे का? मग आताच थांबा, कारण…!

गाडीची पेट्रोल किंवा डिझेल टाकी पूर्ण भरणे धोकादायक आहे. इंधन भरताना 'ऑटो कट' झाल्यावर थांबणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने गाडीचे नुकसान टळते, इंधनाची बचत होते आणि संभाव्य अपघातही टाळता येतात.

| Updated on: Oct 06, 2025 | 3:55 PM
1 / 8
आपल्यापैकी अनेकजण कार किंवा टू व्हीलरमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टाकी फुल करतात. ही गोष्ट आपल्या गाडीसाठी उत्तम असते, असे अनेकांना वाटते. पण असे अजिबात नाही.

2 / 8
जेव्हा तुम्ही तुमच्या कार किंवा टू व्हीलरची टाकी पेट्रोल-डिझेलने फुल्ल करता, तेव्हा तुमच्या गाड्या खराब होण्याचा धोका असतो. गाडीची टाकी फुल्ल केल्याने नेमकं काय होतं, याबद्दल जाणून घेऊया.

3 / 8
कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेलची पूर्ण टाकी भरल्याने जास्त दाब निर्माण होतो. या अतिरिक्त दाबामुळे कारच्या इंधन प्रणालीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच यातील काही नाजूक भाग खराब होऊ शकतात.

4 / 8
जेव्हा टाकी काठोकाठ भरलेली असते, तेव्हा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे इंधन बाहेर सांडण्याची शक्यता असते. हे बाहेर सांडलेले इंधन निरुपयोगी ठरते, ज्यामुळे तुमचे नुकसान होते.

5 / 8
प्रत्येक आधुनिक वाहनात इंधनाच्या बाष्पांना वातावरणात मिसळण्यापासून रोखण्यासाठी एक बाष्पीभवन उत्सर्जन नियंत्रण प्रणाली (EVAP) असते. टाकी ओव्हरफ्लो केल्यास इंधन या प्रणालीच्या कॅनिटरमध्ये (Canister) शिरू शकते, ज्यामुळे ही यंत्रणा खराब होते आणि तुम्हाला दुरुस्तीचा खर्च येऊ शकतो.

6 / 8
ज्यावेळी तुम्ही इंधनाची टाकी पूर्णपणे भरता, तेव्हा तुम्ही अनावश्यक वजन वाहून नेत असता. जास्त वजनामुळे इंजिनला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे मायलेज कमी होतो आणि इंधनाचा वापर वाढतो.

7 / 8
प्रत्येक कारच्या इंधन टाकीची एक निश्चित क्षमता असते, जी कार उत्पादकाद्वारे निश्चित केली जाते. ती त्या मर्यादेपर्यंत भरणे चांगले मानले जाते. त्यामुळे यापुढे पेट्रोल किंवा डिझेल भरताना, इंधन पंपाचे नॉझल जेव्हा पहिल्यांदा आपोआप कट (Auto Cut) होईल, तेव्हा पंप अटेंडंटला भरणे थांबवण्यास सांगा.

8 / 8
ऑटो कट नंतर अधिक इंधन भरून टाकी काठोकाठ भरू नका. ऑटो कट म्हणजे टाकी सुरक्षित आणि कार्यक्षम स्तरावर भरली गेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही अशा प्रकारे इंधन भरलात तर तुमचे इंधन वाया जाणार नाही. तसेच संभाव्य अपघात टाळता येतील.