Suniel Shetty: सुनील शेट्टीचं स्वप्नवत हॉलिडे होम; ओसाड जमिनीवर 400 हून अधिक झाडं लावून फुलवलं नंदनवन

Suniel Shetty: बॉलिवूड स्टार्सची आलिशान घरं पाहण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. मात्र सुनील शेट्टीचं हे हॉलिडे होम त्याच्या साधेपणामुळे आणि निसर्गाशी जोडलेल्या डिझाइनमुळे वेगळं ठरतं. मुंबईच्या गजबजाटापासून दूर, डोंगरांच्या कुशीत आणि हिरवाईच्या सान्निध्यात उभं असलेलं हे घर पाहिल्यावर ‘ड्रीम होम’ची व्याख्याच बदलून जाते.

| Updated on: Sep 10, 2026 | 8:42 AM
1 / 8
Suniel Shetty: बॉलिवूडचा ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टी केवळ आपल्या दमदार अभिनयासाठीच नाही, तर निसर्गाशी असलेल्या जवळच्या नात्यासाठीही ओळखला जातो. त्याच्या घराची झलक पाहिल्यानंतर ही गोष्ट आणखी प्रकर्षाने जाणवते.

Suniel Shetty: बॉलिवूडचा ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टी केवळ आपल्या दमदार अभिनयासाठीच नाही, तर निसर्गाशी असलेल्या जवळच्या नात्यासाठीही ओळखला जातो. त्याच्या घराची झलक पाहिल्यानंतर ही गोष्ट आणखी प्रकर्षाने जाणवते.

2 / 8

खंडाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेलं सुनील शेट्टीचं हॉलिडे होम म्हणजे आलिशानपणा आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ आहे. सुनील शेट्टीचं हे घर एखाद्या सामान्य सेलिब्रिटी होमपेक्षा खूप वेगळं आहे. घराच्या रचनेमध्ये निसर्गाला मध्यवर्ती स्थान देण्यात आलं आहे.

3 / 8

खंडाळ्याच्या डोंगराळ परिसरात, हिरवाईने वेढलेल्या जागेवर हे घर उभं आहे. घरात प्रवेश केल्यापासून बाहेरील निसर्ग आणि आतील इंटेरिअर यांच्यातील सुंदर कनेक्शन लक्ष वेधून घेतं. या घराचं सर्वात खास आकर्षण म्हणजे त्याची शांत आणि प्रसन्न वातावरणनिर्मिती.

4 / 8

मोठ्या खिडक्या, मोकळ्या जागा आणि आजूबाजूला असलेली हिरवाई यामुळे घरामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा सहज पोहोचते. शहरातील धावपळीपासून दूर जाऊन काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण अगदी योग्य वाटतं.

5 / 8

सुनील शेट्टीच्या या घराच्या डिझाइनमध्ये ‘लक्झरी’चा अर्थ केवळ महागड्या वस्तू किंवा भपकेबाज सजावट असा नाही. उलट, नैसर्गिक घटक, मातीच्या छटा, लाकूड आणि साधेपणातून आलिशानपणाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे घर आधुनिक असूनही त्यात एक उबदार, घरगुती भावना जाणवते.

6 / 8

या घरातील आणखी एक आकर्षक भाग म्हणजे स्विमिंग पूल. घराच्या परिसरातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत पूलमध्ये वेळ घालवण्याची कल्पनाच एखाद्या रिसॉर्टसारखी वाटते. घराच्या परिसरात असलेला बुद्धाचा लाइफ-साइज पुतळाही लक्ष वेधून घेतो. त्यामुळे संपूर्ण परिसराला शांत, मेडिटेटिव्ह वातावरण मिळतं.

7 / 8

सुनील शेट्टीच्या घरातून त्याचा निसर्गावरील प्रेमाचा अंदाज येतो. खंडाळ्यातील या फार्महाऊसचं नाव ‘जहान’ असं आहे. एकेकाळी कोरडी आणि ओसाड असलेली जमीन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हिरवाईने नटवण्यात आली. या परिसरात 400हून अधिक झाडं असल्याचं वृत्त आहे.

8 / 8

सुनील शेट्टीसाठी घर म्हणजे केवळ राहण्याची जागा नाही, तर स्वतःशी आणि निसर्गाशी जोडून घेण्याचं ठिकाण आहे. त्यामुळेच त्याच्या हॉलिडे होममध्ये दिखाव्यापेक्षा शांतता, मोकळेपणा आणि हिरवाईला अधिक महत्त्व दिलेलं दिसतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us