Sunita Williams Returns : सुनिता विल्यम्सची पृथ्वीवर गृहवापसी, भारताच्या लेकीच्या पुनरागमनाचे खास Photos

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले. (भारतीय वेळेनुसार) आज पहाटे 3.30 च्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले.

| Updated on: Mar 19, 2025 | 7:20 AM
1 / 6
अवघ्या 8 दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या मात्र तब्बल 9 महिने तिथे अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही अखेर पृथ्वीवर दाखल झाले. (Photos : Nasa / Social Media)

2 / 6
सुनिता आणि त्यांचे सहकारी बुच यांना घेऊन नासा आणि space X चं कॅप्सूल भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 च्या सुमारास पृथ्वीवर दाखल झालं.

3 / 6
जेव्हा यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तेव्हा त्याचे तापमान 1650 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. या काळात काही काळ कम्युनिकेशन ब्लॅकआऊट झालं होते. ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते फ्लोरिडा महासागरात उतरेपर्यंत सुमारे 17 तास लागले. जेव्हा कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले तेव्हा अनेक डॉल्फिन त्याच्याभोवती पोहताना दिसले आणि अंतराळवीरांचे घरी स्वागत केले.

4 / 6
पहाटेच्या सुमारास फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचं यशस्वी लँडिंग झालं आणि त्यांच्या कुटुंबियांसह जगभरातल सर्वांचांच जीव भांड्यात पडला. त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुनिता आणि बुच यांच्या यशस्वी गृहवापसीमुळे फक्त  अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे.

5 / 6
सुनिता विल्य्म्स आणि बुच विल्मोर या दोघांनीही गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं. अवघ्या 8 दिवसांसाठी ते अंतराळात गेले होते.

6 / 6
मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ते तेथेच अडकून पडले. कित्येक महिन्यांपासून त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर 9 महिन्यांनी, आता मार्च महिन्यात त्यांची गृहवापसी झाली.