
सनी देओल याचा लेक राजवीर देओल याने दोनो या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, राजवीर देओलचा पहिलाच चित्रपट फ्लाॅप गेल्याने मोठा धक्का बसलाय.

दोनो हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. सहा दिवसांमध्ये 1 कोटीचा आकडा देखील गाठण्यात चित्रपटाला यश मिळाले नाही.

दोनो या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10 लाख, दुसऱ्या दिवशी 15 लाख, तिसऱ्या दिवशी 15 लाख कमाई केली. मात्र, यानंतर चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

रिपोर्टनुसार रिलीजच्या 6 व्या दिवशी चित्रपटाने 5 लाखांची कमाई केलीये. दोनो हा चित्रपट 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला चित्रपट आहे.

मात्र, अजूनही चित्रपटाने साधी 1 कोटींची कमाई देखील केली नाहीये. यामुळे हे स्पष्ट आहे की, सनी देओल याच्या लेकाचा हा दोनो चित्रपट फ्लाॅप गेलाय.