Super Foods for Vitamin D: थंडीत व्हिटामिन D ची पूर्तता या 6 पदार्थांनी करा, पाहा कोणते ?

थंडीत अनेक घराबाहेर जास्त जात नाहीत, त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन मिळत नाही. या हवामानात व्हिटामिन डीची कमतरता जाणवते. त्यामुळे तुमच्या आहारात अशा वस्तूंचा समावेश करा ज्यामुळे ही कमतरता पूर्ण होईल.व्हिटामिन्स डी कोवळ्या ऊन्हापासून शरीर स्वत:तयार करत असते. परंतू थंडीत अनेक जण कोवळ्या ऊन्हात जाऊन फिरत नाही. त्यामुळे आहारात काही पदार्थांचा समावेश करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

| Updated on: Jan 06, 2026 | 4:08 PM
1 / 6
 ड्राय फ्रूट्स खाऊ शकता - ड्रायफ्रुटसचा वापर थंडीत करु शकता. परंतू यात व्हिटामिन्स डी खूप जास्त असत नाही, परंतू हे शरीरासाठी चांगले असते. बदाम, अक्रोड आणि आळशीसारख्या सिड्स शरीरास आतून मजबूत बनवतात. थंडीत आवश्यक फॅटही प्रदान करतात.

2 / 6
 मासळी - मासे खाणाऱ्यांमध्ये व्हिटामिन्स डीची कमतरता राहत नाही.हिवाळ्यात यांच्या सेवनाने शरीराला आतून ताकद मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.थंडीत होणारी  गुडघे दुखी आणि  सूज कमी होण्यास देखील मदत होते.

3 / 6
दूधाचा समावेश - तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या आहारात दूधाचा आणि त्यापासून तयार झालेल्या पदार्थांचा वापर करुन शकता. थंडीत रोज एक ग्लास कोमट दूध पिण्याने शरीरास उष्णता तर मिळलेच परंतू हाडे देखील मजबूत होतील. मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना यास खास फायदा होईल.

4 / 6
अंड्यांचे सेवन - अंडी व्हिटामिन्स डीचा एक सोपा आणि परिणामकारक स्रोत मानला जातो. रोजच्या धावपळीत अंडी असे अन्न आहे जे खायला पटकन तयार करता येते. आणि बराच वेळ ऊर्जा देते. थंडीत रोज दोन अंडी खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन्स डीची कमरता पूर्ण होईलच शरीराला प्रोटीन देखील मिळेल.त्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतील.

5 / 6
मशरूमचा समावेश - शाकाहारी लोकांसाठी मशरुम एक चांगला पर्याय आहे. हे असे एकमेव अन्न आहे ज्यात नैसर्गिक रुपाने व्हिटामिन्स डी आढळते. थंडीत मशरुमची भाजी वा सूप केवळ स्वादच वाढवत नाही तर शरीरास एक आवश्यक पोषक तत्व देखील मिळते. हे पचायला हलके असल्याने फायदा होतो.

6 / 6
कोवळे ऊन - केवळ अन्नपदार्थांचा समावेश करुन भागत नाही. थंडीत कोवळ्या उन्हात चालल्याने देखील नैसर्गिकरित्या व्हिटामिन डी मिळते. रोज १५ ते २० मिनिटे चालल्याने शरीरास फायदा होतो. त्यासोबत हलका वॉक वा एक्सरसाईज केल्याने शरीर एक्टीव्ह राहाते. आणि पोषक तत्वांचा योग्य फायदा होतो.