AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : पुढील 24 तास धोक्याची, थेट इशारा, राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये…

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालतोय. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

IMD Weather Update : पुढील 24 तास धोक्याची, थेट इशारा, राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये...
Rain
| Updated on: Feb 26, 2026 | 7:26 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल बघायला मिळतोय. मध्येच उकाडा तर मध्येच पाऊस अशी स्थिती आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यासह देशात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय. राज्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. नांदेड, वर्धा, परभणी, बीड आणि यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. आजही राज्यातील वातावरणात चढउतार बघायला मिळेल. हवामान विभागाने काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि यवतमाळ या भागात आज हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस होईल. राज्यातील काही भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. ढगाळ वातावरणामुळे उष्णता अधिक जाणवेल. उष्णता आणि पाऊस अशी स्थिती राज्यात बघायला मिळेल.

धुळे येथील राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 12.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 36.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र, सततच्या वातावरण बदलाचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. यासोबतच मुंबईतील वायू प्रदूषण गंभीर प्रश्न बनला आहे.

राज्यात मागीत तीन दिवसात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे हाती आलेले पिक गारपिटीमुळे केले. हवामान विभागाने 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. अशातच यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील जांब जुली पारवा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने गहू हरभरा ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात रब्बी पिकांचे मोठे नुकसान. अवकाळी पावसामुळे मंद्रूप मधील शेतकऱ्याचे ज्वारी पूर्णपणे खराब झाली. हातातोंडाशी आलेली ज्वारी अवकाळी पावसामुळे हातातून गेली. खरीब हंगामानंतर आता रब्बी हंगामातील पीके हातातून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे खराब झालेली ज्वारी आता हातात येणार नाही. त्यामुळे आता सरकारने आम्हाला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...