
सुपरस्टार द रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा धनुष यांनी 18 वर्षांच्या सहवासानंतर आता आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलंय. मात्र तुम्हाला माहितीये का याआधी धनुषचं बॉलिवुडच्या एका टॉपच्या अभिनेत्रीशी नाव जोडलं जात होतं.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून कमल हसन यांची मुलगी श्रृती हसन आहे. एकेकाळी या दोघांच्या अफेअरची खूप चर्चा रंगली होती.

2011 मध्ये धनुष आणि श्रृतीने 3 या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यावेळी या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा होती.

श्रृतीला या विषयी एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं असता, 'आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मात्र त्यापलिकडे काहीही नाही. अफेअरच्या बातम्या आणि चर्चा सगळं खोटं आहे, असं म्हटलं तिने होतं.'

धनुषची पत्नी ऐश्वर्याने या सगळ्याचं खंडण केलं होतं. 'श्रृती आणि धनुष चांगले मित्र आहेत. पण त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. ते चुकीचं आहे. आम्ही दोघं एकत्र खुश आहोत.', ऐश्वर्याने म्हटलं होतं. पण आता ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटानंतर धनुष आणि श्रृतीच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे.