नालासोपारा समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आला वाहत, यंत्रणा अलर्टवर, नागरिकांमध्ये दहशत

नालासोपाराच्या कळंब समुद्रकिनाऱ्यावर एक संशयास्पद कंटेनर सापडलाय. प्राथमिक अंदाजानुसार, तो मालवाहू जहाजातून समुद्रात पडला असावा. कंटेनरमध्ये सध्या वॉलपेपर असल्याचे दिसून आले आहे, परंतु पोलिसांच्या पंचनाम्यानंतरच त्यातील वस्तूंची पूर्ण माहिती उघड होईल.

| Updated on: Jul 22, 2025 | 1:28 PM
1 / 5
नालासोपारा समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आला वाहत, यंत्रणा अलर्टवर, नागरिकांमध्ये दहशत

2 / 5
मालवाहतूक जहाजामधून तो समुद्रात पडला असावा आणि तो वाहत आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

3 / 5
प्रथमदर्शनी सध्या कंटेनरमध्ये  वॉलपेपर असल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी त्याचा पंचनामा करून तो पूर्ण उघडल्यानंतरच त्यात नेमके काय आहे हे समजणार आहे.

4 / 5
सध्या अर्नाळा पोलीस, कोस्टल गार्ड, आणि संबंधित यंत्रणा समुद्र किनाऱ्यावर पोहचली असून, ओहोटीची वाट पाहत आहेत.सध्या समुद्राला काही प्रमाणात भरती असल्याने कंटेनर समुद्राच्या पाण्यात आहे.

5 / 5
हा कंटेनर कुठून आणि कसा आला, त्यात काही संशयास्पद वस्तू आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या अज्ञात कंटेनरमुळे नागरिकांमध्ये काही  काळ भीतीचे वातावरण होते.