पश्चिम बंगालमध्ये जायंट किलर ठरलेल्या नेत्याची संपत्ती किती? आकडा पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती आणि राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

| Updated on: May 05, 2026 | 12:30 PM
1 / 10
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. या ऐतिहासिक विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर आले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. या ऐतिहासिक विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर आले आहे.

2 / 10

सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवून आपला दबदबा सिद्ध केला आहे. या निवडणुकीतील सर्वात मोठी लढत भवानीपूर मतदारसंघात झाली. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात १५,१०५ मतांनी पराभव केला.

3 / 10

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सुवेंदू अधिकारी यांना ७३,९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मतांवर समाधान मानावे लागले. या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात मोठे सत्तांतर पाहायला मिळत आहे.

4 / 10

भवानीपूरसोबतच सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातही आपला गड राखला आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या पवित्र कार यांचा ९,६६५ मतांनी पराभव करत नंदीग्रामवर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले.

5 / 10

पश्चिम बंगालच्या राजकारणात जायंट किलर ठरलेले सुवेंदू अधिकारी हे राजकारणातील मोठे प्रस्थ असूनही, त्यांची जीवनशैली अत्यंत साधी असल्याचे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या नेत्यांच्या जगात सुवेंदू यांच्याकडे स्वतःची साधी कार देखील नाही.

6 / 10

निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत सुवेंदू अधिकारी यांच्या वार्षिक उत्पन्नात सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये त्यांचे उत्पन्न सुमारे ८.१३ लाख रुपये होते, जे २०२४-२५ पर्यंत वाढून १७.३८ लाख रुपयांवर पोहोचले आहे.

7 / 10

सुवेंदू अधिकारी यांच्याकडे एकूण ८६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या विविध ८ बँक खात्यांमध्ये मिळून सुमारे ७.९५ लाख रुपये जमा आहेत. त्यांनी सरकारी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स (NSC) आणि किसान विकास पत्रांमध्ये सुमारे ८.६५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

8 / 10

विशेष म्हणजे, त्यांच्याकडे सध्या केवळ १२,००० रुपये रोख आहेत. स्थावर मालमत्तेचा विचार केल्यास, सुवेंदू यांच्याकडे सुमारे ५९ लाख रुपयांच्या मालमत्ता आहेत. यात नंदीग्राम आणि एग्रा भागात त्यांच्याकडे सुमारे २.४६ एकर शेतजमीन आहे. यातील काही जमीन त्यांना कुटुंबाकडून वारसाहक्काने मिळाली आहे.

9 / 10

सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर दोन फ्लॅट्स आहेत, जे त्यांनी २००६ मध्ये खरेदी केले होते. या मालमत्तांचे सध्याचे बाजारमूल्य अंदाजे ६.१३ लाख रुपये आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या प्रतिज्ञापत्रातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ते पूर्णपणे कर्जमुक्त आहेत.

10 / 10

त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे, वित्तीय संस्थेचे किंवा खासगी व्यक्तीचे एक रुपयाचेही देणे नाही. तसेच, त्यांच्याकडे कोणतेही सोने-चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us