IND vs USA : मोठ्या मनाचा हिटमॅन, अमेरिकेविरूद्ध रोहित शर्माने तो धाडसी निर्णय घेतलाच अन् भारत जिंकला
T20 World Cup 2024 IND vs USA : वर्ल्ड कपमधील 25 वा सामना टीम इंडिया आणि अमेरिकेध्ये पार पडला, भारताने हा सामना जिंकला, पण या सामन्याम्यध्ये रोहित शर्मा याने एक धाडसी निर्णय घेतला होता. ज्याची जोरदार चर्चा होत आहे, रोहितवर टीका केली जात होती पण कॅप्टन म्हणून त्याने खेळाडूंवर दाखवलेला विश्वासच आज महत्त्वाचा ठरला.

टीम इंडिया आणि अमेरिका संघातील सामना सात विकेटने भारताने जिंकला आहे. हा सामना जिंकत आपला सलग तिसरा विजय भारताने मिळवत सुपर 8 मधील आपली जागा पक्की केली आहे. रोहितने या सामन्यात एक मोठा आणि साहसी निर्णय घेतला.

टीम इंडिया आणि अमेरिका सामन्यात रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर 110-8 धावा केल्या होत्या. या टीम इंडियाने 18.2 ओव्हरमध्ये 113-3 हे आव्हान पूर्ण केलं.

या सामन्यामध्ये संघात काही बदल होतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र रोहितने आपल्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे. कारण शिवम दुबे हा अत्यंत खराब फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याच्या जागी संघात संजू सॅमसन याला मधळ्या फळीत फलंदाजीसाठी घ्यावं असं बोललं जात होतं.

शिवम दुबेच नाहीतर भारताचा स्टार खेळाडू सुर्याही खराब खेळत होता. मात्र आजच्या सामन्यात रोहितने संघात कोणताही बदल केला नाही. दोघांनाही खेळवलं आणि दोघे मॅचविनर ठरले, विजयी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

सुर्यकुमार यादव याने नाबाद ५० (2 चौकार, 2 षटकार) तर शिवम दुबे नाबाद 31 धावा (1चौकार, 1षटकार) खेळी केली.