
Australia vs India

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये या सामन्यामध्ये कांगारू जखमी वाघासारखे खेळतील. आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर त्यांचे सेमी फायनल सामन्याचे तिकीट बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून राहणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने सुपर-8 मधील आपला पहिला अफगाणिस्तानविरूद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये विजयासाठी आपली पूर्ण ताकद लावताना दिसेल. मात्र टीम इंडियामध्ये एक असा खेळाडू ज्याला ऑस्ट्रेलियाचा संघ घाबरत असावेत.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रिषभ पंत आहे. गाबा कसोटीवेळी पठ्ठ्याने एकट्यानेच कसोटी सामना फिरवली होती. ज्या मैदानावर विरोधी संघाला कधी विजय मिळवता आला नव्हता. त्या गाबाचा घमंड पंतने मोडला होता.