
टीम इंडिया आणि बांगलादेशमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी 7.30 वाजता टॉस होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडिया इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे.

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत 48 सामने खेळलेत. यामधील 32 सामने जिंकले असून 15 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. जर आज टीम इंडियाने बांगलादेशला हरवलं तर 33 वा विजय ठरणार आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीमध्ये सध्या श्रीलंका पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंका संघानेही 33 विजय मिळवले आहेत. तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.

T20 विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांची यादी:- श्रीलंका - 33 विजय, भारत - 32 विजय, पाकिस्तान - 30 विजय, ऑस्ट्रेलिया - 30 विजय आणि दक्षिण आफ्रिका - 30 विजय

दरम्यान, टीम इंडियाने आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवला तर सेमी फायनलचं तिकीट आणखी पक्क करणार आहे. टीम इंडियाचा फॉर्म पाहता बांगलादेश संघासाठी मोठं आव्हान असणार आहे. तर टीम इंडिया आपला नेट रनरेट आणखी चांगला करण्याचा प्रयत्न करणार आहे.