
टी-20 वर्ल्ड कप 2024सध्या सुरू असून साखळी सामन्यांनंतर आता सुपर-8 फेरी सुरू आहे. आठ संघांमधून चार संघ सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करतील.

भारतीय संघही यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. अद्याप एकही सामना भारताने गमावलेला नाही. अपराजित असलेल्या भारतीय संघाला हरवणं सोपं नाही. कारण संघ तितका मजबूत आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एक असा खेळाडू ज्याने मागील वन डे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेतली होती. यंदा सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटींगने विरोधी संघावर हल्ला चढवत आहे. हा खेळाडू एकदम खास आहे.

या खेळाडूची प्रेम कहानी चित्रपटातील कथेप्रमाणे आहे. चॅम्पियन लीग 2012 मध्ये डिकॉक साशाला मुंबई इंडियन्स आणि हायवेल्ड लायन्स या सामन्यात भेटला होता. त्यावेळी या खेळाडूची पत्नी हायवेल्ड लायन्स या संघासाठी चीअरगर्ल म्हणून काम करत होती. या सामन्यानवेळी भेट झाली, त्यानंतर सोशल मीडियावर ओळख त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. 2016 ला दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून क्विंट डिकॉक आहे. डिकॉकने 6 सामन्यात 187 धावा केल्या असून यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.