Tanushree Dutta : इमरानसोबत इंटिमेट सीनने उडालेली खळबळ, नाना पाटेकरांच्या निधनावर आनंद, बॉलिवूडपासून का दूर आहे तनुश्री?
Tanushree Dutta : अभिनेत्री तनुश्री दत्ता सतत अभिनेते नाना पाटेकर याच्यावर वादग्रस्त वक्तव्य करत आनंद व्यक्त करत आहे. पण एकेकाळी तिच्या इंटिमेट सीनने सर्वत्र खळबळ उडालेली... तर जाणून घ्या आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर का आहे.

Tanushree Dutta : बॉलिवूडचे दिग्गद दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ता सर्वत्र चर्चेत आली आहे. एकीकडे नानांच्या निधनावर प्रत्येक जण दुःख व्यक्त करत आहे तर, दुसरीकडे तनुश्री दत्ता आनंद व्यक्त करत आहे.
तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद फार जुने आहे. आता नानांच्या निधनानंतर तनुश्री जे विधान करत आहे, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. अशात लोक तनुश्री हिच्याबद्दल सर्च करत आहेत आणि तिच्याबद्दल सर्वकाही जाणुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
तनुश्री हिने 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात तनुश्री अभिनेका इमरान हाश्मी आणि सोनू सूद यांच्यासोबत दिसली, सिनेमात तनुश्री आणि इमरान यांनी अनेक इंटिमेट सीन दिले. त्यांच्या किसिंग सीनने तर सर्वत्र खळबळ माजली होती... सिनेमातील गाणी आजही चर्चेत आहेत.
तनुश्री हिने स्वतःच्या फिल्मी करियरमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं. पण हळू - हळू तनुश्री बॉलिवूडपासून दूर होत गेली... 2013 मध्ये आलेल्या टीव्ही सीरिज 'सुपरकॉप्स वर्सेस सुपर विलेन्स' मध्ये अभिनेत्री दिसलेली.
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादाबद्दल सांगायचं झालं तर, 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज'मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं... सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत होते. तर तनुश्री दत्ता, रिमी सेन आणि मुजम्मिल इब्राहिम या सेलिब्रिटींनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.
असं म्हटलं जातं की, तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद या सिनेमातील एका विशेष डान्स सिक्वेन्स चित्रीकरणादरम्यान सुरू झाला. चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांचे आपल्याशी असलेले वर्तन अयोग्य होतं आणि त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटलं, असा आरोप नंतर तनुश्रीने केला; मात्र, नानांनी हे आरोप फेटाळून लावले होते.