T20i World Cup 2026 : भारताला मोठा झटका, मॅचविनर बॉलर वर्ल्ड कपमधून आऊट! कुणाला संधी?
वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत दुसऱ्या सामन्यानंतर ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. मात्र सलग दुसऱ्या सामन्यानंतर भारताला मोठा झटका लागला आहे.

वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केलीय. भारताने सलग 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर भारतीय संघाला मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाची गोलंदाज श्रेयांका पाटील हीला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयांका पाटील हीला दुखापतीमुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. श्रेयांकाला 17 जून रोजी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. (Photo Credit : GETTY IMAGES)

श्रेयांका पाटील हीला नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यात बॉलिंग करताना दुखापत झाली होती. श्रेयांका पाटील हीला बाहेर व्हावं लागल्याने भारताला मोठा झटका लागला आहे. मात्र श्रेयांका बाहेर झाल्याबाबत बीसीसीआयने माहिती दिलेली नाही. (Photo Credit : GETTY IMAGES)

श्रेयांकाने आपल्या ओव्हरदरम्यान बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. श्रेयांकाचा या प्रयत्नात पाय मुरगळला. त्यामुळे श्रेयांका पडली. त्यानंतर श्रेयांकाला स्ट्रेचरद्वारे मैदानाबाहेर न्यावं लागलं होतं. स्ट्रेचरवरुन श्रेयांकाला मैदानाबाहेर नेण्यात आल्याने तिला झालेली दुखापत चिंताजनक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. (Photo Credit : GETTY IMAGES)

दरम्यान आता श्रेयांका पाटील हीच्या जागी भारतीय संघात कुणाला संधी दिली जाणार? याची चर्चा पाहायला मिळत आहे. श्रेयांकाच्या जागी अनुष्का शर्मा हीला संधी मिळू शकते. मात्र आता अंतिम काय निर्णय होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : GETTY IMAGES)