
रोहित शर्माला टीम इंडियातील दोन खेळाडूंसोबत प्रॉब्लेम आहे. रोहितला त्यांच्यासोबत रुम सुद्धा शेअर करायची नाहीय.

नेटफ्लिक्सवर कॉमेडियन कपिल शर्माचा शो येणार आहे. या कार्यक्रमात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर दोघे सहभागी झालेले. रोहितला या कार्यक्रमात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने मनातली गोष्ट सांगितली.

कपिल शर्माने रोहितला विचारलं, कुठल्या दोन अशा प्लयेरची नाव सांग, ज्यांच्यासोबत तुला रुम शेअर करायची नाहीय आणि का?. रोहित म्हणाला की, प्रत्येक प्लेयरसाठी आता स्वतंत्र रुम असते. पण माझ्यावर अशी वेळ आलीच, तर मी शिखर धवन आणि ऋषभ पंत सोबत रुम शेअर करणार नाही.

रोहितने ज्या दोघांची नाव घेतली, त्यातला एक रोहितचा खास मित्र आहे. दुसरा त्याला मोठा भाऊ मानतो. मग इतके जवळचे असून रोहित या दोघांसोबत रुम शेअर करायला का तयार नाहीय?.

रोहितने या मागच कारण सांगितलं. दोघेही खूप घाणेरडे राहतात. दोघांच्या रुम अस्ता-व्यस्त असतात. म्हणून मी त्यांच्यासोबत रुम शेअर करणार नाही. रोहित शर्मा या शो मध्ये आणखी एक गोष्ट बोलला. टीममध्ये आलेले नवीन खेळाडू धोकादायक असल्याच सांगितलं. ड्रेसिंग रुममध्ये हे खेळाडू शिव्या सुद्धा देतात असं रोहित म्हणाला.