
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडसोबत होणार आहे. या सामन्याला काही तास बाकी असून हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. भारताला मागील वर्ल्ड कपमध्ये किवींनीच बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे रोहितसेना काहीशी दबावात असणार आहे.

भारताच्या सामन्याआधी भारताचा माजी खेळाडू इरफाण पठान याने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताचा 15 तारखेला सामना होणार आहे.

इरफान पठाने याने भविष्यवाणी करताना फायनलमधील दोन संघांची नावं सांगितली आहेत. इरफानच्या मते फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ येणार नाही.

इरफानने भविष्यवाणी करताना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये फायनल होणार आहे. आफ्रिकेच्या संघाची कामगिरी पाहता ते कांगारूंना जड जातील, असं इरफानचं म्हणणं आहे.

भारतानेही लीग स्टेजमधील एकही सामना गमावला नाही. न्यूझीलंड संघाला भारताने पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड मानलं जात आहे.