
Kuldeep Yadav Update : कुलदीप यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये कदाचित पुढच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. कुलदीप यादव सध्या सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्याने दमदार गोलंदाजी केली. पण कदाचित तो दुसऱ्या टेस्टमध्ये खेळताना दिसणार नाही. (Photo: PTI)

कुलदीपने एक लेटर लिहिलय. त्यामुळे त्याला दुसऱ्या टेस्टमधून वगळलं जाऊ शकतं. त्याने ते पत्र BCCI ला पाठवलं आहे. कुलदीपने बीसीसीआयला पत्र लिहून लग्नासाठी सुट्टी मागितली आहे. कुलदीपला ही सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीरीजमधील उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नाही. (Photo: PTI)

TOI ने BCCI सूत्रांच्या हवाल्याने लिहिलय की, कुलदीप यादवच लग्न नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आहे. कुलदीपची गरज कधी लागेल? हे आधी टीम मॅनेजमेंट पाहिलं. त्यानुसार त्याला तितक्या दिवसांची सुट्टी मिळेल. (Photo: PTI)

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरी टेस्ट मॅच 22 नोव्हेंबरपासून गुवहाटीमध्ये सुरु होईल. कुलदीपच लग्न महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. आता लग्नामुळे त्याला दुसऱ्या टेस्टपासून सुट्टी मिळेल की 30 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये तो खेळणार नाही. (Photo: PTI)

कोलकाता टेस्टमध्ये कुलदीप यादवच्या प्रदर्शनाबद्दल बोलायच झाल्यास त्याने पहिल्या डावात 14 षटकं गोलंदाजी केली. 36 रन्स देऊन 2 विकेट काढले. (Photo: PTI)