
एकता कपूर हिची नागिन मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते. नागिन 1 नंतर आता नागिन 6 टीआरपीमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसले.

नागिन 6 मध्ये बिग बाॅस विजेती तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेत आहे. मात्र, आता नागिन 6 मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी पुढे येतंय.

आता नागिन 6 बंद होणार आहे. नागिन 6 चा या आठवड्यामध्ये शेवटचा एपिसोड असणार आहे. नागिन 6 नेहमीच टीआरपीमध्ये टाॅपला राहिले आहे.

नागिन 6 मध्ये धमाकेदार अभिनय करताना तेजस्वी प्रकाश ही दिसली होती. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

बिग बाॅस 15 मधून बाहेर पडल्यानंतर लगेचच तेजस्वी प्रकाश हिला नागिन 6 मालिका मिळाली होती. काही दिवस हे सीजन पुढे ढकलण्यात आले होते.