
अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

आता तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय. एकदम साधी साडी, ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि केसात गुलाबाचं फूल तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

तेजस्विनीच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. मात्र तिच्या फॅशन सेन्सचे देखील अनेक चाहते आहेत.

‘तेजाज्ञा’ या फॅशन ब्रँडद्वारे तेजस्विनीनं स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे.

‘त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का...?’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.