
अमेरिकेतील टेक्सासमधील उवाल्डे शहरातील शाळेत एका माथेफिरूने शाळेत अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 18 वर्षीय माथेफिरू तरुणाने केलेल्या हल्ल्याच्या या घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 19 शाळकरी मुले तीन तसेच हल्लेखोराच्या आजीचाही समावेश आहे.

18 वर्षीय हल्लेखोराने रॉब एलिमेंटरी शाळेत वर्गात घुसुन गोळीबार केला. या हल्ल्यात 18 विद्यार्थ्यांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर तीन शिक्षकांनाही जीव गमवावा लागला. हल्लेखोरही स्वत: ठार झाला असून तो उवाल्डे हायस्कूलचा विद्यार्थी होता. शाळेतील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यापूर्वी माथेफिरूने घरात आजीवरही गोळीबार केला.

विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोराने बुलेटप्रूफ जॅकेट घातलं होतं, तसंच हातात बंदुक होती. यानंतर तो शाळेतील वेगवेगळ्या वर्गात गेला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली.

अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. Gun Violence Archive च्या माहितीनुसार, 2022 मध्ये गोळीबाराच्या किमान 212 घटना झाल्या आहेत.

या घटनेनमुळे अमेरिकेत हाहाकार उडाला बसवून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यावेळी एक राष्ट्र म्हणून आपल्याला विचारावे लागेल की, देवाच्या नावाने बंदूक चालवणाऱ्या लॉबीच्या विरोधात आपण कधी उभे राहणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

एक राष्ट्र म्हणून आपल्याला विचारायचे आहे की, देवाच्या नावाने आपण बंदुक लॉबीच्या विरोधात कधी उभे राहणार? तसेच देशातील प्रत्येक नागरिकाच्या वेदना कृतीत बदलण्याची हीच वेळ आहे. आपण या देशातील प्रत्येक निवडून आलेल्या अधिकाऱ्याला हे स्पष्ट केले पाहिजे की हीच कृती करण्याची वेळ आली आहे- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन

गोळीबाराच्या धक्कादायक घटनेनंतर व्हाईट हाऊसवरील अमेरिकाच ध्वज अर्धा खाली घेतला आहे. उप कमला हॅरिस यांनीही या घटने प्रकरणी शोक व्यक्त केला आहे