Kalyan Crime News : 2 वर्षांची चिमुरडी अट्टल गुन्हेगार? थेट खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, पोलिसांच्या कारनाम्याने सगळेच अवाक!

सध्या महाराष्ट्र पोलिसांचा एक अजब कारनामा समोर आला आहे. पोलिसांनी चक्क दोन वर्षांच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे.

| Updated on: Oct 24, 2025 | 8:10 PM
1 / 5
पोलीस आणि वकील यांच्या नादाला लागू नये असं म्हणतात. एकदा यांच्या कचाट्यात सापडलं की काही खरं नाही, असंच सामान्य लोक म्हणतात. पोलीस कधी काय करतील हे सांगता येत नाही. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे.

पोलीस आणि वकील यांच्या नादाला लागू नये असं म्हणतात. एकदा यांच्या कचाट्यात सापडलं की काही खरं नाही, असंच सामान्य लोक म्हणतात. पोलीस कधी काय करतील हे सांगता येत नाही. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे.

2 / 5

ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात पोलिसांनी अवघ्या दोन वर्षांच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

3 / 5

कल्याण मोहने परिसरात गावगुंडांनी लहुजी नगर परिसरात दगडफेक करत लाठ्या-काठ्यांनी महिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

4 / 5

याच प्रकरणात पोलिसांनी 2 वर्षाच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्रयत्न करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत दोन वर्षांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

5 / 5

अटक आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता दोन वर्षांच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे वकिलाने न्यायाधीशाच्या निदर्शनास आणून दिल्याने तपसा अधिकाऱ्यांची बोबडी वळली. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us