PHOTO | BCCI च्या निवड समितीत गोलंदाजांचा बोलबाला

| Updated on: Dec 25, 2020 | 3:26 PM

भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

1 / 5
 टीम इंडियाचे माजी खेळाडू चेतन शर्मा यांची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनील जोशींच्या जागी चेतन शर्मांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदासह पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. या निवड समितीत गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. विविध झोनमधून अनेक माजी गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा हे नॉर्थ झोनकडून समितीचे सदस्य आहेत.

2 / 5
बीसीसीआयच्या निवड समितीत सुनील जोशी हे आता निवडकर्त्याची भूमिका बजावणार आहेत. जोशी यांची दक्षिण झोनमधून समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील जोशी हे या समितीतील एकमेव फिरकीपटू आहेत.

3 / 5
उडीसाचा गोलंदाज देबाशीष मोहंतीची इस्ट झोनमधून टीम इंडियाच्या समितीवर निवड करण्यात आली आहे.

4 / 5
मुंबईचा वेगवान गोलंदाज अबेय कुरुविला टीम इंडियाच्या निवड समितीत वेस्ट झोनचे प्रतिनिधित्व करणार आहे.

5 / 5
तसेच पंजाबचे बोलिंग कोच असलेले भारताचे माजी क्रिकेटपटू हरविंदर सिंह यांची सेंट्रल झोनमधून निवड केली आहे.