Bollywood actor | अखेर ‘या’ अभिनेत्याने सोडले सततच्या फ्लाॅप चित्रपटावर माैन, मोठे भाष्य करत म्हणाला
गेल्या काही दिवसांपासून सतत बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटाचा देखील यामध्ये समावेश आहे. एकीकडे बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत, तर दुसरीकडे साऊथचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत.
1 / 5

ईशान खट्टर याचे एका मागून एक असे दोन चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. ईशान खट्टर याने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये.
2 / 5

ईशान खट्टर याने धडक आणि बियॉन्ड द क्लाउड्स चित्रपटाच्या माध्यमातून एक चांगली सुरूवात बाॅलिवूडमध्ये नक्कीच केलीये. मात्र, त्यानंतर त्याचे चित्रपट धमाका करत नाहीयेत.
3 / 5

खाली पीली आणि फोन भूत हे दोन्ही चित्रपट ईशान खट्टर याचे फ्लाॅप गेले. या चित्रपटाला काहीच धमाका करता आला नाही. आता यावर एका मुलाखतीमध्ये ईशान खट्टर हा बोलताना दिसला.
4 / 5

ईशान खट्टर म्हणाला की, अपयशानंतर यशापर्यंत पोहचणे खूप महत्वाचे असते. मी सतत त्यासाठी खूप जास्त मेहनत घेत आहे. मी माझ्यामध्ये सुधारणा देखील करतोय.
5 / 5

ईशान खट्टर याच्या बोलण्यातून हे स्पष्ट झाले आहे की, अपयशानंतर अजिबातच ईशान खट्टर हा खचला नाहीये. आता आगामी पिप्पा चित्रपटात तो दिसणार आहे.
Follow Us