
ओबीसी आरक्षण बचावसाठी वडीगोद्री येथे उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. गेल्या 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री ता अंबड येथे ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषण करत आहेत

ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे सरकारने सांगावे. आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत आम्ही असचं उपोषण सुरु ठेवणार असं हाके यांनी म्हटलं होतं

मात्र आज सरकारचे शिष्टमंडळ हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या पत्राचं वाचन केलं

ओबीसी नेत्यांच्या बैठकीत अनेक मागण्या पूर्ण झाल्यात. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. अधिवेशन काळात इतर मागण्यांवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

आपलं उपोषण 10 दिवसांपासून सुरु. 1 ते 2 मागण्या सोडल्या तर बाकी मागण्या पूर्ण करण्याचं सरकारचं आश्वासन. त्यामुळे आम्ही आमचं उपोषण स्थगित करतो असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे