
अभिनेते महेश बाबू आणि नम्रता हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे महेश बाबू आणि नम्रता यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे.

महेश बाबू यांनी अभिनेत्री नम्रता हिला पहिल्यांदाच बघितल्यावर ते तिच्या प्रेमात पडले होते. यांची पहिली भेट ही चित्रपटाच्या सेटवरच झाली.

विशेष म्हणजे आता महेश बाबू आणि नम्रता यांच्या लग्नाला तब्बल 19 वर्षे झाली आहेत. 2005 मध्ये महेश बाबू आणि नम्रता यांनी लग्न केले.

तेलुगू फिल्म 'वामसी' च्या सेटवर महेश बाबू आणि नम्रता यांची पहिली भेट झाली. त्यानंतर हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

नेहमीच सोशल मीडियावर महेश बाबू आणि नम्रता हे सक्रिय दिसतात. महेश बाबू यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. महेश बाबू यांचे चित्रपट नेहमीच धमाका करतात.