
‘झी मराठी’ वरील ‘चला हवा येऊ द्या’ही मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

भाऊ कदम असो वा सागर कारंडे, श्रेया बुगडे असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत, ‘चला हवा येऊ द्या‘च्या सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली 6 वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

या आठवड्यात चला आठवड्यात चला हवा येऊ दयाच्या मंचावर हजेरी लावली ती म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील कलाकारांनी.

यावेळी कलाकारांनी मालिकेतील अनुभव शेअर केले. या भागात मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे खानविलकरांच्या घरातील मुख्य सदस्य ‘जादू’.

भाऊ कदम बरोबर जादूने एकच धमाल उडवून दिली. हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी यावेळी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेवर स्पूफ करून एकच हास्यकल्लोळ उडवून दिला.

‘निलेश साबळे यांनी साकारलेला ओम’ आणि भाऊ यांनी साकारलेली स्वीटू’ यावेळी भाव खाऊन गेली.