
Maruti Suzuki Baleno : मारुतीची प्रीमियम हॅचबॅक बलेनो ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत सहभागी आहे. या कारमध्ये तुम्हाला 6 एयरबॅग मिळतात. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 8.43 लाख रुपये आहे.

Kia Sonet : किआ सॉनेट हे दमदार फीचरचे मॉडेल तुम्हाला आरामात वाजवी किंमतीत मिळेल. या एसयुव्हीच्या प्रत्येक व्हेरिएंटमध्ये 6 एयरबॅग मिळतील. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 7.99 लाख रुपये आहे.

Tata Nexon : टाटा नेक्सॉन ही सुरक्षेसाठी चांगली एसयुव्ही मानण्यात येते. जागतिक NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. या एसयुव्हीमध्ये ग्राहकाला 6 एयरबॅग मिळतात. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 8.15 लाख रुपये आहे.

Hyundai Aura : हुंदाईची ही लोकप्रिय सिडेन कार आहे. तिच्यावर ग्राहक फिदा आहेत. ग्राहकाला या कारमध्ये हुंदाई एक्स्टर सारखच्या 6 एयरबॅग मिळतात. भारतात या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 6.48 लाख रुपये इतकी आहे.

Hyundai Exter : जर तुम्ही 10 लाखांपेक्षा कमी किंमतीतील कार शोधत असाल तर हुंदाई एक्स्टर हा चांगला पर्याय ठरु शकतो. ही भारतातील सर्वात स्वस्त SUVs पैकी एक आहे. हुंदाईने या एसयुव्हीला सुरक्षेबाबत एकदम जबरदस्त तयार केले आहे. यामध्ये ग्राहकाला 6 एयरबॅग मिळतात. या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 6.12 लाख रुपये आहे.