एका संगीतकाराचा हट्ट अन् जन्माला आलं मराठी सिनेसृष्टीतील रोमँटिक गाणं; सोनू निगमच्या आवाजातील ‘या’ गाजलेल्या गाण्यामागची रंजक गोष्ट
एका म्युजिशियनचा हट्ट… आणि जन्माला आलं एक असं लव्ह सॉंग, जे आजही प्रत्येकाच्या मनात वाजतं. कधी कधी एखादं गाणं सिनेमासाठी बनतं… पण नकळत तेच गाणं सिनेमाची ओळख बनून जातं. 'या' गाण्यामागची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? लगेच खालील माहिती वाचा.

एका Musician चा हट्ट, दिग्दर्शकाचा सुरवातीला नकार आणि त्यातून जन्माला आलं असं गाणं जे पुढे प्रत्येक लव्ह स्टोरीची ओळख बनलं.
२०१३ साली एक सिनेमा आला, या सिनेमासाठी सुरवातीला फक्त तीन गाणी ठरली होती, पण म्युजिक कम्पोजर पंकज पडघन यांनी जेव्हा सिनेमा पहिला तेव्हा त्यांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे चित्रपटात इतक्या सुंदर लव्ह स्टोरी आहेत पण त्यांना जोडणारं एक रोमँटिक गाणंच नाही.
त्यांनी हि गोष्ट दिग्दर्शक संजय जाधव यांच्या कानावर घातली पण सुरवातीला त्यांचा याला काही होकारच न्हवता, मात्र पंकज पडघन यांचा आग्रह सुरूच राहिला आणि मग अखेर त्यांच्या ह्या गोड हट्टाला यश आलं.
एक सुंदर ट्यून तयार झाली आणि त्या वेळच्या नवोदित लिरिकिस्ट मंगेश कांगणे यांना ह्या गाण्यासाठी पहिली ओळ सुचली आणि ह्या गाण्याला आवाज दिला सोनू निगम यांनी आणि प्रेक्षकांच्या भेटीला आलं असं गाणं जे आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
दुनियादारी चित्रपटातील टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात....