
हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक हे विभक्त झाले असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर दोघांच्या लवकरच घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. नताशाने हार्दिक पांड्या घर सोडल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच आता मुंबईतील बांद्रा परिसरात नताशा ही एक व्यक्तीसोबत स्पॉट झालीये. तेंव्हापासूनच तो व्यक्ती कोण? याबद्दलची चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे नताशा ज्या व्यक्तीसोबत स्पॉट झालीये तो सायबेरियन मॉडल अलेक्जेंडर एलेक्स इलिक हा आहे. एलेक्स आणि दिशा पटानी एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते.

आता चक्क नताशा हिच्यासोबत अलेक्जेंडर एलेक्स इलिक हा स्पॉट झालाय. अलेक्जेंडर एलेक्स इलिक आणि नताशा हे मुंबईतील एका कॅफेत जाताना स्पॉट झाले.

नताशा हिने काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्यासोबतचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले. आता अलेक्जेंडर एलेक्स इलिक यालाच नताशा डेट करत असल्याची चर्चा आहे.