Gold Price Today : धाडकन कोसळले सोन्याचे भाव, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात मोठी खळबळ, थेट सोने..
Gold Price Today : सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. त्यातच आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने कोसळताना दिसत आहे. चांदीच्याही दरात आता मोठी घसरण झाली.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच आता 26 ऑक्टोबर 2026 चे सोन्याचे दर पुढे आले आहेत. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
आज 24 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,840 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1, 42, 720 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोने 5,080 रूपयांनी स्वस्त झाले तर 22 कॅरेट सोने 4,650 रूपयांनी स्वस्त झाले. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,570 रूपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोने 1, 30, 690 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला.
सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्यांना मोठी घसरण नोंदवण्यात आली. त्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली.
यासोबतच चांदीच्या भावातही मोठी घसरण नोंदवण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात देशभरात सोन्याच्या भावाता मोठी घसरण ही नोंदवली जात आहे.