
भारतातील अझीम प्रेमझी भारतातील सर्वात मोठे उद्योजक असून त्यांची 'विप्रो' कंपनी देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.

भारताच्या मुस्लीम उद्योजकांच्या यादीमधील दुसऱ्या क्रमाकांचे नाव 'मेराज मनाल' यांचे आहे. मेराज मनाल हे 'हिमालया'या हर्बल कंपनीचे मालक आहेत.

रफीक मलिक भारतातील तिसरे सर्वात मोठे मुस्लिम व्यावसायिक आहेत. रफीक मलिक हे 'मेट्रो' या प्रख्यात फुटवेअर कंपनीचे मालक आहेत.

यूसुफ अली भारताचे चौथे सर्वात मोठे मुस्लीम व्यावसायिक आहेत. यूसुफ अली अनेक देशात प्रसिद्ध असलेल्या 'लुलु मॉल'चे मालक आहेत.त्यांचा व्यवसाय हॉटेल आणि मॉलचा आहे.

शहनाझ हुसैन या भारताच्या पाचव्या सर्वात मोठ्या मुस्लीम व्यावयासिक आहेत. शहनाझ हुसैन स्किन केअर आणि ब्यूटी क्रीमचा व्यवसाय करतात.त्यांच्या कंपनीचे नाव 'शहनाझ हर्बल्स इंक'असे आहे.

भारतातील सर्वात मोठ्या मुस्लीम व्यासायिकाच्या यादीत सहावा नंबर यूसुफ ख्वाजा हमीद यांचा लागतो. यूसुफ हमीद हे प्रसिद्ध फार्मा कंपनी 'सिप्ला'चे मालक आहेत.

भारताच्या सातव्या मोठ्या मुस्लीम बिझनसमनचे नाव शमून सुल्तान असे आहे. शमूल सुल्तान यांचा खादीच्या कपड्यांचा व्यवसाय आहे.

भारताचे आठवे मोठे मुस्लीम बिजनसमन रशीद अहमद मिर्झा यांचा बुट आणि पादत्राणाचा व्यवसाय आहे. रशीद अहमद मिर्झा यांचा 'रेड टॅप' हा शु ब्रँड प्रचंड प्रसिद्ध आहे.