
विशेषतः उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. दही शरीराला थंड ठेवण्यास केवळ मदत करत नाही तर शरीराला अनेक फायदेही मिळतात. दही ही खाणे पोटासाठी खूप चांगले मानले जाते. कारण ते चांगले बॅक्टेरिया वाढवून पचन सुधारण्यास मदत करते.

काही लोक दह्यामध्ये साखर मिसळून खातात, तर काही लोक मीठ आणि मिरपूडपण मिसळून खातात. पण जर कोणी दही मध मिसळून खाल्ले तर ते अधिक फायदेशीर आहे.

हार्वर्डमध्ये झालेल्या संशोधनानुसार हेल्थच्या मते, मधामध्ये 17 टक्के पाणी, 31 टक्के ग्लुकोज आणि 38 टक्के फ्रक्टोज असते. याव्यतिरिक्त, त्यात झिंक, मॅंगनीज, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे.

दह्यामध्ये मध मिसळून खाल्ल्याने शहरीरातील प्रोटीनचा कमतरता भरून निघण्यास मदत होते. नियमित वर्कआऊट केल्यानंतरही तुम्ही याचे सेवन करू शकता.

चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनेही दह्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, प्रोबायोटिक्स, खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट सोर्स असतो. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)