
बाॅलिवूडच्या अभिनेत्री चित्रपटांमधून आणि जाहिरातींमधून चांगलीच तगडी कमाई करतात. विशेष म्हणजे एका चित्रपटाला या तब्बल 20 कोटींच्या आसपास फिस देखील घेतात. इतकेच नाही तर बाॅलिवूड अभिनेत्री कोट्यावधींच्या घरात कर देखील भरतात.

दीपिका पादुकोण सर्वाधिक कर भरणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे एका चित्रपटासाठी दीपिका पादुकोण ही 20 ते 25 कोटींच्या आसपास फिस घेते. रिपोर्टनुसार दीपिका दरवर्षी 10 कोटींच्या आसपास कर भरते.

यामध्ये आता दुसरे नाव हे आलिया भट्ट हिचे आहे. रिपोर्टनुसार आलिया भट्ट देखील एका वर्षाला साधारणपणे 6 कोटींच्या आसपास कर भरते. आलियाचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून धमाका करताना दिसत आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही देखील तगडी कमाई चित्रपटांमधून आणि जाहिरातीमधून करते. रिपोर्टनुसार एका वर्षाला कतरिना कैफ ही 5 कोटीपर्यंत कर भरते.

बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेला. मात्र, चित्रपटांमधून मोठी कमाई की करीना करते. करीना कपूर देखील वर्षाला मोठा कर भरते.