
महिलांसाठी ही योजना फायदेशीर आहे. या योजनेत महिला आणि मुलींच्या नावे खाते उघडता येते. या योजनेत वयाची कोणतीही अट नाही. कोणतीही भारतीय महिला अथवा मुलगी या योजनेत गुंतवणूक करू शकते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत दोन वर्षात चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसतंर्गत ही योजना सुरू करता येते. या योजनेत दोन वर्षात लाख रुपये जमा होऊ शकतात.

ही योजना FD पेक्षा जास्त रिटर्न देते. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2025 ही आहे. या योजनेत महिलांना गुंतवणुकीसाठी वयाची अट नाही. कोणतीही भारतीय महिला, मुलगी या योजनेत गुंतवणूक करू शकते.

1 हजार ते 2 लाखांपर्यंत कोणीही योजनेत गुंतवणूक करू शकतात. महिला सन्मान योजनेतंर्गत जमा रक्कमेवर 7.5 टक्के वार्षिक परतावा मिळतो.

जर सरकारी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केली तर दोन वर्षानंतर या रक्कमेवर 32, 044 हजारांचे व्याज मिळेल. तर एकूण 2,32,044 रुपये रिटर्न मिळेल.

या योजनेत एक वर्षानंतर रक्कम काढता येते. त्यानुसार खातेदाराला 40 टक्क्यांपर्यंत रक्कम आंशिक स्वरुपात काढता येईल.