
लढ्याला यश : जळगाव जिल्ह्यातील केळीची उत्पादकता आणि वाढते क्षेत्र पाहता केळीला पिकाचा दर्जा मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसानाची भरपाई देखील अल्प प्रमाणात मिळत होती त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती.

केळी उत्पादनात होणार वाढ : निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागाचे मोठे नुकसान होत होते. शिवाय अनुदान शासकीय मदतहीन मिळत नव्हती. आता मात्र, केळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना योजनांचा तर लाभ होणारच आहे. पण उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचेच प्रयत्न राहणार असल्याने येथील उत्पादकांना अच्छे दिन येतील असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रोजगार हमी योजनेत सहभाग:अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ आता केळी उत्पादकांना घेता येणार आहे.

केळी खोडाचे पूजन अन् शहरभर मिरवणूक : अर्थसंकल्पात केळीचा फळामध्ये समावेश करण्याचा निर्णय होताच शेतकरी, व्यापारी यांनी रावेल शहरात केळीच्या खोडाचे पूजन केले तर केळीची पाने घेऊन शहरभर ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवूक काढली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.