क्लायमॅक्स असा की ‘धुरंधर’ही विसराल; बजेटच्या 25 पट कमाई, हा मराठी सिनेमा आजही प्रचंड लोकप्रिय

Low Budget Hit Film : अनेक कमी बजेटच्या प्रादेशिक चित्रपटांनी केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर कमाईच्या बाबतीतही मोठे रेकॉर्ड सेट केलेत. यापैकीच एक असा चित्रपट आहे, जो रिलीज होऊन 1 दशक उलटलं तरी आजही खूप लोकप्रिय आहे. तुम्ही ओळखला का तो चित्रपट..?

| Updated on: Apr 30, 2026 | 2:18 PM
1 / 5
Low Budget Hit Film : एखादी मोठी अभिनेत्री किंवा अभिनेता नसतानाही, एखाद्या चित्रपटाने आपल्या बजेटच्या 25 पट कमाई करणं हे खरंतर दुर्मिळ आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेला एक चित्रपट असा आहे,  ज्याने एका गोड प्रेमकथा आणि जातीयवादावर आधारित कथानकासह, रेकॉर्डतोड कामगिरी करत मोठा पडदा गाजवला. हा चित्रपट म्हणजे 'सैराट'. 2016 साली आलेल्या या चित्रपटाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झाली आणि अजूनही तो चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान टिकवून आहे. (Photos : Social Media)

2 / 5
'सैराट'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरूने चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या अभिनेत्रीने चित्रपटातील अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले. रिंकू व्यतिरिक्त, या चित्रपटात आकाश ठोसरनेही मुख्य भूमिका साकारली होती. सैराटमध्ये रिंकूने  'आर्ची' अर्थात अर्चना पाटील आणि आकाशने  'परश्या' म्हणजेच प्रशांत काळेची भूमिका साकारली होती. हे दोघेही वेगवेगळ्या जातीचे असतात, पण  जातीयवाद आणि श्रीमंत-गरीब संबंधांच्या भिंती तोडून ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र, त्यातच त्यांना कुटुंबाचा विरोध आणि समाज अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

3 / 5
नागराज मंजुळेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.  ऑनर किलींगवर आधारित या चित्रपटाच्या क्लायमॅक्सने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं, त्यांना  रडवलं. हा पिक्चर रिलीज झाल्यावर इतका प्रचंड यशस्वी होईल, याचा कोणालाही अंदाज नव्हता. चित्रपटाचं बजेट केवळ 4 कोटी होतं. पण फक्त भारतातच चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला पार करत 104 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभारत 110 कोटी कमावले. IMDb वर या चित्रपटाला 8.3 रेटिंग असून मिळाले आणि याचा हिंदी रिमेकही बनवण्यात आला.

4 / 5
या चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख मिळाला, तर या चित्रपटाने 2017 च्या फिल्मफेअर मराठी पुरस्कारांमध्ये एकूण 11 पुरस्कार जिंकले. सैराटची लोकप्रियता इथेच थांबली नाही. या चित्रपटाचा कन्नड, पंजाबी, ओरिया, बंगाली भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आणि सर्वात प्रसिद्ध म्हणजे हिंदीमध्ये 'धडक' नावाने तो रिलीज झाला. जान्हवी कपूरने  याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून करिअरची सुरुवात केली, तर ईशान खट्टरही याच चित्रपटात लीड रोलमध्ये होता. 'सैराट' ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि तुम्ही तो Zee5 वर पाहू शकता.

5 / 5
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी असलेल्या जान्हवी कपूरने आणि  अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ, अभिनेता इशान खट्टर या दोघांनी 'सैराट' चित्रपटाचा रिमेक असलेल्या 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आedणि हा चित्रपट तिथेही खूप यशस्वी ठरला. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट अंदाजे 40 कोटी रुपये होते, परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.

Follow Us