‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज

झी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय. या मालिकेला अद्याप वर्षही पूर्ण झालं नाही. टीआरपीच्या शर्यतीत मागे राहिल्याने ही मालिका बंद होत असल्याचं म्हटलं जातंय.

| Updated on: Feb 27, 2025 | 1:26 PM
1 / 5
छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावरही लोकप्रिय असतात. मात्र टीआरपीच्या शर्यतीत काही मालिकांना तग धरून राहणं शक्य होत नाही. म्हणून या मालिकांना आपला गाशा गुंडाळावा लागतो.

2 / 5
झी मराठी वाहिनीवरील अशीच एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षी या वाहिनीने लागोपाठ काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. शिवा, पारू, नवरी मिळे हिटलरला, पुन्हा कर्तव्य आहे, लाखात एक आमचा दादा या मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.

3 / 5
आता याच मालिकांपैकी एक लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं शूटिंग अखेरच्या टप्प्यात आलं आहे. वर्ष पूर्ण करण्याआधीच ही मालिका बंद होत असल्याने चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

4 / 5
या मालिकेत अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्यासोबत वंदना सरदेसाई, मृणाल देशपांडे, शुभांगी सदावर्ते यांसह इतरही अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. मालिकेतील वसुंधरा आणि आकाशची जोडी आता छोट्या पडद्यावरून निरोप घेणार आहे.

5 / 5
या मालिकेला अपेक्षित टीआरपी मिळत नसल्याने दोन वेळा त्याची वेळसुद्धा बदलण्यात आली. आधी ही मालिका रात्री 9.30 वाजता प्रसारित व्हायची. त्यानंतर या मालिकेची वेळ बदलून ती संध्याकाळी 6 वाजता करण्यात आली.