देशातील सर्वांत मोठ्या घोटाळ्याची कहाणी, IMDb वर 9.1 रेटिंग; 5 एपिसोड्सची धमाकेदार सीरिज

सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. आयएमडीबीवर या सीरिजला 9.1 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. देशातील सर्वोत्तम सीरिजपैकी ही एक मानली जाते.

| Updated on: Apr 07, 2026 | 1:43 PM
1 / 6
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला एकापेक्षा एक दमदार वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकी काही सत्य घटनांवर आधारित असतात. अशीच एक जबरदस्त सीरिज सहा वर्षांपूर्वी स्ट्रीम झाली होती आणि प्रेक्षकांनी या सीरिजला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं.

2 / 6
या वेब सीरिजला आयएमडीबीवर 10 पैकी 9.2 रेटिंग मिळाली आहे. यावरूनच त्याची लोकप्रियता लक्षात येते. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सीरिजचं नाव आहे 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी'. देशातील सर्वांत मोठ्या घोटाळ्यावर आधारित ही वेब सीरिज होती. यामध्ये अभिनेता प्रतीक गांधीने मुख्य भूमिका साकारली होती.

3 / 6
'स्कॅम 1992'मध्ये प्रतीक गांधीसोबतच श्रेया धनवंतरी, शारिब हाश्मी, हेमंत खेर, कविन दवे, निखिल द्विवेदी आणि अंजली बरोट यांच्याही भूमिका आहेत. एकेकाळी स्टॉक मार्केटमधील बिग बी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहताची कहाणी यात दाखवण्यात आली होती.

4 / 6
1992 मध्ये जेव्हा हा मोठा घोटाळा उघडकीस आला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यावेळी हा देशातील सर्वांत मोठा घोटाळा होता. हंसल मेहता दिग्दर्शित या सीरिजला देशातील सर्वोत्तम सीरिजपैकी एक मानलं जातं. विशेष म्हणजे निर्मात्यांनी या सीरिजला ओढून ताणून न बनवता पाच एपिसोड्समध्ये दमदार पद्धतीने कथा सांगितली.

5 / 6
तुम्ही सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज पाहू शकता. ही कथा हर्षद मेहताभोवती फिरते. हर्षदचे वडील कापडाचे व्यापारी असतात. त्यांचा व्यवसाय बंद पडताना घरातील आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी हर्षद शेअर बाजाराकडे वळतो.

6 / 6
शेअर बाजारात हर्षद हळूहळू आपला जम बसवतो आणि बँकांसोबत व्यवहार करू लागतो. जेव्हा एका पत्रकाराला त्याच्या कारवाया समजतात, तेव्हा त्याने केलेला मोठा घोटाळा उघडकीस येतं. लॉकडाऊनच्या काळात ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Follow Us